Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

Lonavala : महायुतीच्या वतीने भुशी, रामनगर, पंचशिलनगर भागात धनुष्यबाणाचा प्रचार

लोणावळा : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ( A), रासप, मनसे, एसआरपी घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार संव�

Lonavala | पंचशिलनगर भुशी, रामनगर येथे मतदारांनी पेटविली संजोग वाघेरे यांच्या प्रचाराची मशाल; महिलांचा उत्तम प्रतिसाद

लोणावळा : मावळ लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराच्या सातव्या दिवशी लोणावळा शहरातील पंचशिलनगर भुशी येथे भग�

क्राईम न्युज

Maval News | वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर कारवाई; सुमारे दीड लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांविरोधात गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने वडगाव मावळ येथे 1 मे च्या रात्री 1 वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात 1 लाख 37 हजार 677 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली.     याविषयी बोलताना आयपीएस कार्तिक म्हणाले, वडगाव मावळ येथे मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी (1 मे)  रात्री 1.10 वाजता बातमीच्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव मधील केशवनगर भागातील एका खोलीमध्ये दिब्यांशू श्रीमुलचंद धारिया (वय 21 वर्ष, राहणार केशवनगर, वडगाव) यांच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा 1 लाख 37 हजार 677 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. आरोपीचा साथीदार तनविर शेख (राहणार केशवनगर, वडगाव मावळ) हा पोलिसांची चाहूल लागताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे.        सदरचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 328,272,273,34 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा.अंकुश नायकुडे, पो.हवा. नितेश कवडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.

मावळ

मावळातील कुंडमळा येथे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

लोणावळा : मावळातील कुंडमळा येथे गुरुवारी सायंकाळी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मावळ वन्यजीव रक्षक संस्थेच्या वतीने 7.30 वाजण्याच्या सुमारास दोघांचे पाण्यातून बाहेर काढण्यात आले.         साजीद शरीफ बागवान (वय 20, रा. निगडी) व आतीक शरीफ बागवान (वय 15, राहणार निगडी, मूळ जळगाव) अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. ते गुरुवारी सायंकाळी 6.10 वाजण्याच्या सुमारास कुंडमळा येथे पाण्यात बुडाले होते. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी याबाबत वन्यजीव रक्षक टीमला याबाबत माहिती दिल्यानंतर रेस्क्यु पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवली.       वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या पथकांमधील निलेश गराडे, प्रशांत भालेराव, गणेश गायकवाड, भास्कर माळी, अविनाश कारले, सागर भेगडे, अनिश गराडे, गणेश सोंडेकर व MIDC पोलीस स्टेशन यांच्या पथकाने ही शोध मोहीम राबवली.

पिंपरी चिंचवड

Maval Loksabha Election | संजोग वाघेरे यांच्या प्रचाराला मावळात मिळतोय जोरदार पाठिंबा; मुस्लिम समाज देखील एकवटला

मावळ माझा न्युज नेटवर्क : मागील दहा वर्षात मावळ लोकसभा मतदार संघात दाखविण्यासारखे एकही काम न केल्याने सर्वात अपयशी ठरलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात मावळातील जनता एकवटली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रचाराला मावळात जोरदार पाठिंबा मिळू लागला असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे यांनी सांगितले. मावळातील मुस्लिम समाज देखील त्यांच्या प्रचारार्थ एकवटला असून त्यांनी वाघेरे यांना पाठिंबा दर्शविला आहे.       शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला माझ्या विरोधात देण्यासाठी स्वतःचा उमेदवार नसल्याने त्यांना दुसऱ्या पक्षातून उमेदवार घ्यावा लागला. तसेच विरोधी उमेदवाराने जनतेसाठी काय काम केले आहे असा प्रश्न श्रीरंग बारणे यांनी एका वहिनीला मुलाखत देताना उपस्थित केला होता. याचा समाचार घेताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी म्हणाले, 2014 व 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मत मागणाऱ्या बारणे यांना विकास कामांचा विसर पडला आहे. ज्यांच्या जीवावर निवडून आले त्या भाजपाला देखील त्यांनी कधी विचारले नाही. तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असताना ते पुन्हा त्यांच्यात नावावर मते मागत आहेत. निवडून आल्यानंतर मतदार संघातून गायब होणारे खासदार पुन्हा निवडणुकीला दिसत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात त्यांच्या विरोधात नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या कार्य अहवालात दहा वर्षात काय ठोस कामे केली हे न सांगता प्रस्तावित कामे दाखवली आहे. अशा या निष्क्रिय व्यक्तीला आता घरी बसवण्याची वेळ आली असल्याने सर्वसामान्य मतदार एकवटला आहे. मागील दोन निवडणुकीत राष्ट्रीय मुद्द्यांवर मतदान करणारा तरुण आज मात्र दहा वर्षात खासदारांनी आमच्यासाठी काय केले हा प्रश्न उपस्थित करत आहे. शेतकरी, महिला ह्या देखील दहा वर्षात आमच्यासाठी काय केले हा स्थानिक प्रश्न उपस्थित करत आहे. सर्वच मतदार संघात काय काम केले ते दाखवा व मगच मत मागा असे खुले आवाहन नागरिक करत त्यांना नाकारत असल्याने नैराश्यातून ते प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करत असल्याचे संजोग वाघेरे यांनी सांगितले. वाघेरे म्हणाले, ही निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतली आहे. त्यांचे प्रश्न वर्षानुवर्षे न सुटल्याने ते संतप्त झाले आहेत. मतदार संघाचा रखडलेला विकास हाच माझा अजेंडा असणार आहे.       काल पर्यंत त्यांच्या विरोधात आग पाखड करणारे आज स्वतःच्या भवितव्यासाठी त्यांना मत द्या असे आवाहन नागरिकांना करत आहे. मात्र नागरिक देखील स्पष्ट शब्दात तुमच्या वेळेस काय ते बघू आता आम्हाला काय करायचे ते करू द्या असे थेट नेत्यांला सुनावत असल्याने त्यांची देखील अडचण झाली आहे. सर्वसामान्य मतदारांना त्यांच्या समस्या सोडविणारा, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणार लोकप्रतिनिधी हवा आहे. केवळ संसदेत मोठ मोठी भाषण करत स्वतःच्या नावावर रेकॉर्ड बनविणारा नको आहे.       तळेगाव दाभाडे, वडगाव, कान्हे, नायगाव भागात महा विकास आघाडीच्या वतीने प्रचार राबवत वाघेरे यांच्या प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेस  पक्षाचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी शरद पवार गटाची अध्यक्ष दत्तात्रेय पडवळ, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, शांताराम भोते, अमित कुंभार, युवराज सुतार, सुरेश गायकवाड, मदन शेडगे, सोमनाथ कोंडे आदी उपस्थित होते.

Video News

अन्य बातम्या

समस्त महाजन चॅरिटेबल ट्रस्ट ची आढावा बैठक ठाण्यात संपन्न

मावळ माझा न्युज : समस्त महाजन चॅरिटेबल ट्रस्ट यांची वर्षभरातील कार्याचा आढावा घेणारी बैठक ठाणे येथील टीप टॉप प्लाझामध्ये पार पडली. अहमदाबाद येथील हिंदू साधू समितीचे अध्यक्ष स्वामी परमतानंदजी व जैन आचार्य लोकेश मुनीजी यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.        यावेळी बोलताना आचार्य लोकेश मुनीजी म्हणाले, समस्त महाजन चॅरिटेबल ट्रस्ट ही संपूर्ण भारतामध्ये पशु वैद्यकीय उपचार साठी व प्रत्येक गाव खेड्यामध्ये जल व्यवस्था करण्यासाठी अनमोल कार्य करत आहे. तसेच त्यांनी प्रत्येक गावामध्ये देशी वृक्ष लावण्याचा जो संकल्प केलेला आहे तो कौतुकास्पद आहे.        आचार्य परमतानंदजी म्हणाले, समस्त महाजन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी यावर्षी 35 कोटी रुपयांचे सामाजिक कार्य केलेले आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. व भारत सरकारच्या जिवंत पशु विक्रीच जी व्यवसायाला परवानगी देण्यात आलेली होती त्यास त्यांनी केलेला विरोधामुळे भारत सरकारला त्या निर्णयावर फेर विचार करावा लागला. त्यांच्या अहिंसा प्रेमी कार्यास त्यांनी शुभेच्छा आशीर्वाद दिले. सदर कार्यक्रमाच्या वेळी समस्त महाराजांचे अध्यक्ष गिरीश भाई शहा, परेशभाई शहा, भाजपा उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.        महाराष्ट्रातील हजारो गोरक्षक यांना मार्गदर्शन करताना गिरीश भाई शहा यांनी महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी पाणी प्रश्न सुटावा व पशु कत्तलखाने बंद व्हावे म्हणून मार्गदर्शन केले. व आतापर्यंत त्यांनी 50 हजार पेक्षा जास्त पशुवर उपचार करत त्यांना जीवनदान दिले असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान येथील हजारो अहिंसा प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

Mavalmaza android application

Coming soon..