लोणावळा : लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा व डेला रिसॉर्ट अँड ऍडव्हेनन्चर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 200 बाटल्या रक्ताचे संकलन झाले. आधार ब्लड बँ
लोणावळा : लोणावळ्यातील ज्येष्ठ पत्रकार व माजी उपनगराध्यक्ष कै. दत्तात्रय कोंडीबा गवळी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी गवळीवाडा येथील श्रीराम क्रिडांगण परिसरात वृक�
लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 1 सप्टेंबर रोजी पहाटे 2.35 वाजण्याच्या सुमारास झालेल्या टेम्पो अपघातात एकाचा मृत्यू झाला. किमी 37/200 जवळ मुंबई लेनवर हा अपघात झाला. बोरघाट महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेम्पो क्रमांक (KA 25 AB 4212) वरील चालक संतोष पटकन शेटटी (वय 27 वर्ष रा. धारवाड कर्नाटक) हा त्याच्या ताब्यातील टेम्पो हा मुंबईच्या दिशेने घेऊन जात असताना त्याचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने सदरचा टेम्पो पुढे जाणारा ट्रक क्रमांक (MH-10-DT-5199) यास पाठीमागून जोरात धडकला. या अपघातात क्लिनर बाजू कडील टेम्पोची केबीन चेंबल्याने क्लिनर गुरूसिददा (वय अंदाजे 25 पुर्ण नाव पत्ता मिळून आला नाही) यास गंभीर दुखापती झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच बोरघाट पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी जात अपघातग्रस्त वाहने आयआरबी कडील हायड्रा व देवदूत टिम चे सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.
तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व जैन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जय बजरंग तरुण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त MIMER वैद्यकीय महाविद्यालय, डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण (धर्मादाय) रुग्णालय, यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत आरोग्य तपासणी, रोग निदान शिबिर मंगळवारी (10 सप्टेंबर) आयोजीत करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जाईल. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुचविण्यात आलेल्या तपासण्या रुग्णालयामध्ये मोफत होतील असे रोटरी क्लबच्या वतीने सांगण्यात आले. रक्त तपासणी, एक्स-रे, ईसीजी, हिमोग्लोबिन चाचणी, रक्तदाब इत्यादीं तपासण्या या शिबिरात होणार आहेत. तसेच या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गरवारे ब्लड बँक यांच्या सहकार्याने घेण्यात येणार आहे.मंगळवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळामध्ये हे मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर जय बजरंग तरुण मंडळ राजेंद्र चौक, तळेगाव दाभाडे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. आरोग्य शिबिरास डॉ सुचित्राताई नागरे, विश्वस्त कार्यकारी संचालिका व डॉ दर्पण महेशगौरी, वैद्यकीय अधीक्षक हे उपस्थित राहणार आहेत. तरी या आरोग्य शिबिराचा तळेगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी सिटी चे अध्यक्ष किरण ओसवाल, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष हितेश राठोड, जय बजरंग तरुण मंडळाचे अध्यक्ष मुकेश गूंदेशा यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा वर्धापन दिन 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बर्ड व्हॅली वाकड येते आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये श्री. वाघमारे यांनी उपस्थितांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. हा वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सर्वतोपरी मदत करत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांचे हात बळकट करण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी महाप्रदेश महिला अध्यक्षा चंद्रकांता ताई सोनकांबळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, अजित भाई शेख, सम्राट जाकाते व रिपब्लिकन पक्षाचे शहर कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते.
खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आपले कर्तव्य बजावत असताना एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना कशा पद्धतीने मदत करावी, वायु किंवा रसायन गळती झाल्यास कोणत्या उपाययोजना राबवाव्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृत्रिम श्वासोश्वास कसा द्यावा या बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, टाटा स्टील लिमिटेड आणि लाईफ गिअर सेफटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट मधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान आणि खालापूर टोल नाका येथील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. डॉ. सुरेश कुमार मेकला - अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, यांचे मार्गदर्शनाखाली तानाजी चिखले (पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र), घनश्याम पलंगे (पोलीस उपअधीक्षक रायगड विभाग), भरत शेंडगे (पोलीस निरीक्षक पनवेल विभाग) आणि अनिल शिंदे (पोलीस उपनिरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट) यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाक्या जवळ मुंबई बाजूस असलेल्या ट्रक टर्मिनल्स येथील सभागृहात हे शिबिर संपन्न झाले. गुरुनाथ साठेलकर, धनंजय गीध, पंकज बागुल, सौरभ घरत, अमोल कदम आणि हरदिप सिंग यांनी प्रशिक्षकाच्या भूमिकेत सर्वांशी संवाद साधून शंकांचे निरसन करत प्रशिक्षणार्थींकडून प्रात्यक्षिक देखील करवून घेतले. महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे पोलीस उपनिरीक्षक संजय हेमाडे आणि गजानन म्हात्रे यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षकांचे स्वागत केले तर पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अत्याधुनिक उपकरणे आणि हाती असलेल्या संसाधनातून आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी या शिबिरातून जुजबी माहिती आणि मिळालेले प्रशिक्षण स्व संरक्षणासोबत महामार्गावरील इतर घटकांना देखील फायद्याचे ठरेल असे मत प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केले.