"एक वही मोलाची" उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप – माजी सभापती बाबासाहेब कंधारे यांचा 18000 वह्या वाटप करण्याचा संकल्प

आंबवणे (ता. मुळशी) : मुळशी तालुक्याचे माजी सभापती रवींद्र राजाराम कंधारे उर्फ बाबासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त "एक वही मोलाची" या उपक्रमाअंतर्गत आंबवणे येथील सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत मुळशी तालुक्यातील धरण परिसरातील विविध माध्यमिक शाळांमध्ये एकूण 18,000 वह्यांचे वितरण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याची सुरुवात आज आंबवणे गावातून करण्यात आली.
कार्यक्रमात माजी सभापती मा. रवींद्र कंधारे यांच्यासह वांद्रेचे सरपंच लहूभाऊ वाळंज, आंबवणेचे उपसरपंच निलेश मेंगडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण दळवी, ग्रामपंचायत सदस्या मेघाताई नेवासकर व अक्षराताई दळवी, समितीचे उपाध्यक्ष उल्हास मानकर, अतिश मरे, विनायक तोंडे, सुनील बोडके, ग्रामसेविका कुंभार मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक भटू देवरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कुलथे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. देवरे यांनी केले. विद्यालयाच्या वतीने बाबासाहेब कंधारे आणि उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात बाबासाहेब कंधारे यांनी आपल्या कार्यकाळातील सामाजिक उपक्रम व विकास कामांच्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेतली.