लोणावळा शिवसेना माजी शहरप्रमुख राहूल शेट्टी यांची हत्या; लोणावळा शहरात 24 तासात दोन खून

लोणावळा : शिवसेना माजी शहरप्रमुख व शिवसेना संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी यांची आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर निर्घृण हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार शेट्टी यांच्या डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत जवळून तीन गोळ्या मारण्यात आल्या आहेत. त्यांना तातडीने लोणावळ्यातील परमार रुग्णालयात हालविण्यात आले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
दसर्याच्या रात्री हनुमान टेकडी येथील गणेश नायडू या युवकांचा देखील धारदार शस्त्रांनी वार करून खून झाल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनांनी लोणावळा शहर हादरून गेले आहे. मागील चार पाच दिवसापुर्वीच लोणावळ्यात सुरज आगरवाल नामक युवकाला दोन गावठी पिस्टल, कोयता व चाकू ह्या हत्यारांसह पकडला होता. एकामागोमाग एक घडलेल्या या घटनांनी लोणावळा शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान शेट्टी यांच्या हत्या प्रकरणी एक प्रत्यक्षदर्शी असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. परमार रुग्णालयाच्या बाहेर शेट्टी सर्मथकांनी मोठी गर्दी केली होती.
याविषयी बोलताना लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत म्हणाले आरोपींचा तातडीने छडा लावत त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली जाईल. नागरिकांनी संयम पाळावा कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन काँवत यांनी केले आहे.