आनंदवार्ता l आंदर मावळातील राजपुरी गावची ईशिता कुंडलिक शिंदे हीचा इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 13 वा क्रमांक

मावळ माझा न्युज नेटवर्क : आंदर मावळ परिसरातील दुर्गम गाव असलेल्या राजपुरी गावची तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळोलीची विद्यार्थीनी कु. ईशिता कुंडलिक शिंदे (इयत्ता ८वी) उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती 2023 - 2024 या परीक्षेत संपूर्ण राज्यात 13 वी आली आहे तसेच तिची राज्यस्तरीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
सध्या अनेक जिल्हा परिषद शाळा या गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास राबवून शिक्षण देत आहेत. यापैकीच मावळ तालुक्यातील एक शाळा म्हणजे पिंपळोली. या शाळेतील शिक्षक श्रीकांत दळवी सर यांनी ईशिताला शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन केले. इयत्ता 8 वी राज्य गुणवत्ता यादीत आलेली तसेच नवोदय निवड झालेली ईशिता कुंडलिक शिंदे ही मावळ तालुक्यातील एकमेव विद्यार्थीनी आहे. वडिल कुंडलिक शिंदे, आई पिंकू शिंदे यांनी देखील ईशिताला कायम अभ्यासात प्रोत्साहन दिले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत दळवी व शाळेतील सर्व सहकारी शिक्षक, भाजे केंद्राचे केंद्रप्रमुख अमोल चव्हाण, लोनावळा बीटच्या विस्तारअधिकारी शोभा वहिले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, राजपुरी ग्रामस्थ तसेच पिंपळोली ग्रामस्थानी तिचे कौतुक करत पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.