लोणावळा शहरात पर्यटकांची मोठी गर्दी; मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा
लोणावळा : लक्ष्मीपूजन होताच पर्यटकांनी पर्यटन नगरी लोणावळा शहरांमध्ये येण्यास सुरुवात केल्यामुळे आज लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबई व गुजरात भागातील पर्यटकांची यामध्ये मोठी संख्या होती. अनेक वाहनेही गुजरात राज्यातील पासिंगची होती.
मागील काही दिवसापासून लोणावळा शहरातील पर्यटक संख्या घटल्यामुळे व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते मात्र दिवाळी सण येतात शहरात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. दिवाळी सण मधील महत्त्वाचा दिवस असलेला धनतेरस व लक्ष्मीपूजन साजरी होताच पर्यटकांनी पर्यटन स्थळांवर जाण्यास सुरुवात केली आहे. लोणावळा शहरामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येऊ लागल्यामुळे शहरातील सर्वच पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. खंडाळ्यातील बोटिंग क्लब व राजमाची गार्डन भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक वाहने व पर्यटन दिसून आले. पर्यटकांच्या या गर्दीमुळे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फ लांबपर्यंत वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. कुटुंब समवेत अनेक पर्यटक लोणावळा शहरांमध्ये दाखल झाल्यामुळे शहरातील हॉटेल बंगले व फार्म हाऊस ही फुल झाली आहेत. पुढील काही दिवस ही बुकिंग कायम राहणार असल्यामुळे व्यवसायिकांनी आनंद व्यक्त केला. शहरातील व विशेषता मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या चिक्की दुकानांमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली.
उन्हाळी पर्यटनामध्ये लोणावळा शहरात पाहण्यासारखी फार ठिकाणी नसले तरी येथील निसर्गाचा व थंड हवेचा आनंद पर्यटक घेत आहेत. सोबतच लोणावळा शहरांमधील नारायणी धाम, श्री स्वामी समर्थ मठ यासह विविध मनोरंजनाची ठिकाणी व थीम पार्क या ठिकाणी पर्यटक भेट देत आहेत. फार्म हाऊस बंगले या ठिकाणी कुटुंबासमवेत आलेले पर्यटक हे दिवाळी सणाचा आनंद देखील लुटत आहेत रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात फटाक्यांची अताशबाजी देखील त्यांच्याकडून होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
















