Breaking news

पाटण दरडग्रस्त तिकोणे कुटुंबाला प्रशांत भागवत यांच्याकडून 51 हजार रुपयांची रोख मदत

लोणावळा : येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळून घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेत संपूर्ण तिकोणे कुटुंब कोलमडून पडले आहे. या भीषण दुर्घटनेत कै. नंदकुमार तिकोणे, कै. अनिता नंदकुमार तिकोणे आणि कै. ज्ञानेश्वर नंदकुमार तिकोणे यांचा वेदनादायक मृत्यू झाला. या संकटामुळे कुटुंबातील सदस्य श्रीमती निशा ज्ञानेश्वर तिकोणे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण समयी केवळ शाब्दिक सहानुभूती किंवा पोकळ आश्वासने न देता, पीडित कुटुंबाला प्रत्यक्ष कृतीतून आधार देण्याच्या उद्देशाने प्रशांत चंद्रकांत भागवत यांच्या वतीने 51 हजार रुपयांची आर्थिक मदत थेट रोख स्वरूपात सुपूर्द करण्यात आली आहे.

       संकटकाळात धावून जात सामाजिक बांधिलकी जपणे आणि पीडितांना थेट आर्थिक हातभार लावून दिलासा देणे हाच या मदतीमागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी भागवत यांनी सांगितले. मदत वितरणाच्या या प्रसंगी माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा नाणे मावळ भाजपा मंडल अध्यक्ष अनिल गायकवाड, उपाध्यक्ष गणेश साठे, युवक अध्यक्ष सचिन येवले, माजी सरपंच संदिप तिकोणे, प्रभाकर तिकोणे, अतुल मांडेकर यांसह अनेक स्थानिक नागरिकांचा समावेश होता.

इतर बातम्या