Breaking news

महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांना मिळाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा AB फॉर्म; 23 एप्रिल ला भरणार उमेदवारी अर्ज

लोणावळा : मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एबी (AB) फॉर्म पुणे जिल्हा संपर्क नेते आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते देण्यात आला. 23 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर संजोग वाघेरे अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असून महाविकास आघाडीतील सर्व महत्त्वाचे नेते हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

      18 एप्रिल पासून मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल 39 इच्छुकांनी 70 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. 25 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे. मावळ लोकसभेचे महा विकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दोन महिन्यापूर्वीच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी मागील दोन महिन्यांमध्ये संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत जनमत आजमावले आहे. मागील खासदारांविषयी असलेली नाराजी व रखडलेली विकास कामे तसेच मित्र पक्षांना विश्वासात न घेतल्याने त्यांच्यामध्ये देखील झालेली नाराजी या सर्व बाबी या निवडणुकीमध्ये संजोग वाघेरे यांच्या पथ्यावर पडणार आहेत. 23 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर संजोग वगैरे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. सदरचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस आय पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

इतर बातम्या