Breaking news

फोटो रिल्स बनवायचे आहेत मग लोणावळ्यातील या ट्रिक व्हिजन म्युझियम ला नक्की भेट द्या; 3D पेंटींग व इल्युशन म्युझियम

मावळ माझा न्युज चा What's app ग्रुप जॉईन करा 

लोणावळा : सोशल मीडियाच्या जगात वेगवेगळ्या प्रकारचे फोटो व रील्स करून ते प्रसिद्ध करण्याची सर्वत्र स्पर्धा सुरू आहे. याच निमित्ताने लोणावळ्यातील यश राजेंद्र पाटील या वीस वर्षीय तरुणाने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करत लोणावळा शहरांमध्ये एक ट्रिक आर्ट गॅलरी सुरू केली आहे. त्यामध्ये जवळपास 400 फूट कॅनवास वर वेगवेगळ्या प्रकारच्या थ्रीडी पेंटिंग्स, इल्युशन म्युझियम तयार केले आहे. अतिशय दर्जेदार व जागतिक स्तराचे असे हे म्युझियम कलेचा उत्तम नमुना असणार आहे. सोशल मीडियावर फोटो व रील्स बनवणाऱ्यांसाठी हे म्युझियम एक पर्वणी ठरणार असून या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारच्या रिल्स आपण तयार करू शकता तसेच थ्रीडी फोटो सोबत छान फोटो देखील घेऊ शकता असे यश पाटील यांनी सांगितले. मुंबई पुणे हायवेवर वलवण गावाजवळ हे म्युझियम आहे.

     आजकालची तरुण पिढी सतत काहीतरी नवीन असा शोध घेत असते त्यामधूनच यश पाटील या तरुणाने त्यांचे मित्र कलाकार सचिन कुटे (जे कला  क्षेत्रात गेले 30 वर्ष काम करत आहे) ह्यांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली  की आजकाल सोशल मीडिया या माध्यमातून लोकांना वेगवेगळे फोटो अपडेट करून सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहायचे आहे. अशा लोकांसाठी पर्यटन नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरामध्ये काहीतरी वेगळे करावे. त्यामधूनच या थ्रीडी आर्ट ट्रिक गॅलरीची कल्पना पुढे आली. यशाची आई रेश्मा पाटील व वडील राजेंद्र पाटील तसेच त्याचे कलाकार मित्र सचिन कुटे ह्यांनी विचार केला की आपण असे एक थ्रीडी आर्ट व इल्युशन म्युजियम बनवूया. जिथे वेगवेगळ्या ठिकाणचे 3D पेंटिंग व नविन टेक्नॉलॉजी चा वापर करून एलईडी 3D वॉल, इलूजन ट्रिक्स ह्याचे डिस्प्ले करून, ह्यांच्या समोर पर्यटकांना उभे राहून फोटो व रील्स काढून ह्याच्या माध्यमातून ॲडव्हेंचर फोटो, फँटॅसी, फन फोटो काढता येतील आणि पोस्ट करत त्याचा आनंद घेता येईल. म्हणून हया म्युझियम मध्ये वेगवेगळ्या संकल्पना साकारण्यात आल्या असून, नविन  टेक्नॉलॉजी व ललितकला, वॉल आर्ट ह्याची सांगड घालून सुमारे 400 फीट एवढ्या साईझच्या कॅनवास वर पेन्टिंग्स केले आहे. सचिन कुटे यांनी या म्युझियम चे कला दिग्दर्शन करून व कलाकार म्हणून काम केले आहे. त्यांना ही आर्ट गॅलरी बनविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील कलाकार रामचंद्र खरटमल, अरविंद महाजन, अमित ढाणे, अमित आवटे, ओमकार पवार, तुळशीराम जाधव, दिगंबर बनसोडे, विवेक राठोड, अजय उंबरवटे, सुभाष पिंपळे, युवराज जाधव, आनंद ओव्हाळ यांनी मोलाची साथ दिली.

मावळ माझा न्युज चा What's app ग्रुप जॉईन करा

      ट्रिक व्हिजन च्या टीमच्या मदतीने याठिकाणी जगातील निवडक अप्रतिम पेंटिंग व इलूजन पाहण्यास मिळणार आहेत. यश पाटील हे एक कमी वयातील कल्पक उद्योजक असून, सचिन कुठे हे स्वतः एक राष्ट्रीय पातळीवरील कलाकार आहेत. कला क्षेत्रात असलेल्या अनुभवाच्या जोरावर त्या दोघांनी या म्युझियम ची निर्मिती केली आहे. याकरिता त्यांनी अनेक म्युझियम व चित्रांचा अभ्यास केला आहे. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी हे म्युझियम निश्चितच आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

इतर बातम्या