Breaking news

Accident News l मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर उलटला; दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर (वेट अँड जॉय) मुंढावरे गावाशेजारी एक लांबलचक कंटेनर रस्त्यावर पलटी होऊन आडवा झाल्यामुळे मुंबई व पुणे या दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दिवाळी पाडव्याच्या दिवशी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये लांबलचक असा हा कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे त्याने दोनही मार्गिका व्यापल्या होत्या. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने व पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दोन्ही मार्गिका पूर्णपणे बंद झाल्या. या अपघातामुळे महामार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती व लांबच लांब वाहनांच्या रांगा गेल्या होत्या.

अपघाताची माहिती समजताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली व क्रेनच्या साह्याने सदरचा कंटेनर बाजूला करण्यात आला आहे. साधारणपणे दोन ते अडीच तास या मार्गावरील वाहतूक ही पूर्णतः विस्कळीत झाली होती. ऐन सणासुदीच्या काळामध्ये ही घटना घडल्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचा मोठा खोळंबा झाला.

इतर बातम्या