मावळ तालुक्यातील देवले गावात सापडला 12 फुटी अजगर
लोणावळा : मावळ तालुक्यातील देवले गावात तब्बल 12 फूट लांब अंतराचा व 16 किलो वजनाचा अजगर मिळून आला आहे. गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सर्पमित्र मनोहर ढाकोळ, कल्पेश तिखे व देवले ग्रामस्थ यांनी हा अजगर पकडून त्याला जंगलामध्ये त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिले आहे.
मावळ तालुक्यात अनेक गावांमध्ये विशेषता डोंगर भागामध्ये असलेल्या गावांमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या जातीचे साप अजगर तसेच जंगली जनावरे आढळून येत आहेत. देवले गाव हे देखील डोंगराला लागून आहे. रात्री सर्पमित्र मनोहर ढाकोळ यांना देवले गावात अजगर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने गावात भेट देऊन सदरचा अजगर हा रेस्क्यू करून पकडला व सकाळी त्याला जंगलामध्ये त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले आहे.
















