Breaking news

Accident Beaking News : खाजगी प्रवासी बस शिंग्रोबाच्या दरीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू - 28 जण जखमी

लोणावळा : 40 ते 45 प्रवासी घेऊन जाणारी एक खाजगी बस आज पहाटेच्या सुमारास खंडाळा ते खोपोली दरम्यान जुन्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिंग्रोबा घाट उतरताना दरीत कोसळली आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.अपघाताची माहिती समजताच बोर घाट पोलीस, खोपोली पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते, लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कू पथक, वन्यजीव रक्षक संघटना, आपदा संघटना, खोपोलीतील अनेक रुग्णवाहिका व नागरिक मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले असून दरीत जखमी प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत जवळपास 25 जणांना रेस्कू करत दरीतून बाहेर काढत खोपोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अतिशय भिषण असा हा अपघात म्हणावा लागेल. जवळपास 200 फुट खोल दरीत ही बस कोसळली आहे. बस मधील सर्वजण हे गोरगाव मुंबई येथील बाजी प्रभु वादक गटातील (झांज पथक) आहेत. पुण्याचा कार्यक्रम संपवून ते बसमधून गोरगावच्या दिशेने जात असताना शिंग्रोबा मंदिराच्या मागील बाजुला असलेल्या उतार व वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस दरीत कोसळली. पहाटे चार ते सव्वाचार दरम्यान हा अपघात झाला आहे. अपघातात बसचा अक्षरशः खुळखुळा झाला आहे. दरीमध्ये मोठ्या प्रमाणात रेस्कू कार्य सुरु आहे.



इतर बातम्या

Sangmeshwar l राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी प्रयत्नशील; छत्रपती संभाजी स्मारक भव्य दिव्य करण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागाने अभ्यास करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार