Breaking news

आमदार शेखर निकम यांचा 26 मे रोजी चिपळूण शहर पाहणी दौरा; पूर, दरडग्रस्तसह 19 ठिकाणी अधिकारी वर्गासह भेट देणार

चिपळूण/प्रतिनिधी (विलास गुरव) : दरवर्षी पावसाळयात उदभवणारी पूर समस्या, तुंबणाऱ्या नाल्यांमुळे पाणी निचरा होण्यास येणाऱ्या अडचणी, दरडग्रस्त भाग आणि शहरात सुरू असलेल्या विकासकामे, सध्यस्थिती लक्षात घेऊन त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी आमदार शेखर निकम हे 26 मे रोजी अधिकाऱ्यांना घेऊन दिवसभर शहरा दौरा करणार आहेत. 

      सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात शहरातील एकूण 19 ठिकाणे निवडण्यात आली असून या प्रत्येक ठिकाणी ते भेट देणार आहेत. पावसाळयात चिपळूण शहरातील नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पावसाळयापूर्वा शहरातील दरडग्रस्त, निचरा झाल्याने तुंबलेल्या पाण्यासह संभाव्य पूरग्रस्त भागांची पाहाणी करण्याचा निर्णय आमदार निकम यांनी घेतला आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी साडेदहा वाजता बहादूरशेख नाका येथून या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. येथील तोडण्यात आलेल्या जाण्या पुलामुळे गणेश विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर तेथे घाट बांधण्यासह करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पाटबंधारे व बांधकाम विभाग अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. त्यानंतर वांगडे मोहल्ला येथे एस.टी. शेड मारणे आदी पाहणी करणार आहेत. त्यानंतर कराड रोडवरील बीएसएनएल ऑफीस, परांजपे स्किम, डी.बी.जे महाविद्यालय महामार्ग सर्व्हिस रोड, जिप्सी कॉर्नर, वडनाका, चिंचनाका, मध्यवर्ती बसस्थानक, पार्कींग बांधकाम पाहणी, विरेश्वर कॉलनी, पेठमाफ नाईक पूल, बाजारपेठ खेराडे कॉम्लेक्स, मुरादपूर गणपती मंदिर आदी ठिकाणी पाणी भरणे समस्या असल्याने या ठिकाणीं प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. 

         दरम्यान, खेंड महालक्ष्मीनगर, कांगणेवाडी दुर्गआळी, गोवळकोट आदी दरड कोसळणाऱ्या ठिकाणी, तर पेठमाप गाळ उपसाबरोबरा दुरूस्ती करण्यात आलेल्या एन्रॉन पूलीही ते या दौऱ्यात पाहणी करणार आहेत. त्याबरोबर शहरासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून साकारत असलेल्या विविध विकास कामाची सध्यस्थितीही या भेटीत पाहणीवेळी जाणून घेणार आहेत. या दौऱ्यानंतर ते शहरासाठी ते आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या उपाय योजनांबाबत सबंधित विभागाना देणार आहेत. या दौऱ्यात नगर परिषद, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, एस.टी. आगार अधिकारी सहभागी होणार आहेत.

इतर बातम्या

Sangmeshwar l राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी प्रयत्नशील; छत्रपती संभाजी स्मारक भव्य दिव्य करण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागाने अभ्यास करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार