Breaking news

गुढीपाडवा धमाका ऑफर | ओकीनावा ई बाईक वर लोणावळ्यात तब्बल 21 हजार रुपयांची सुट

लोणावळा : ई बाईक श्रेणीमध्ये सर्वाधिक विकली जाणारी ओकिनावा ई बाईक (Okinawa E Bike) या गुढीपाडव्याला धमाका ऑफर घेऊन आली आहे. ओकिनावा प्रेसी प्रो (Okinawa Praise Pro) या गाडीवर तब्बल 21 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. 1 लाख २१ हजार रुपये किंमत असलेली ही गाडी गुढीपाडव्याच्या निमित्त केवळ 99,999/- मध्ये विकत घेता येणार असल्याची माहिती लोणावळ्यातील वलवण या गावात असलेल्या मोटो प्लेस या शोरुमचे दुर्वेश जगदाळे यांनी दिली. ओकिनावा ही विविध अवॉर्ड विनर ई बाईक असून ती बाईक मध्ये सर्वाधिक विकली जाणारी व उत्तम प्रतिसाद देणारी गाडी म्हणून ओळखली जाते. गुढीपाडव्याची ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. त्यानंतर गाडीच्या किंमतीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे या गुढीपाडव्याला व अक्षय तृतीयेला गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ओकिनावा प्रेस प्रो या गाडीला नक्कीच प्राधान्य द्या व वाढत्या महागाईच्या काळामध्ये पैशाची बचत करा व आरामदायी गाडी चालवण्याचा आनंद घ्या.

     ओकीनावा प्रेस प्रो ही गाडी एका चार्ज मध्ये 90 km चालते. तीचा हायस्पीड 70 ते 75 km प्रती तास असल्याने ती कोठेही घेऊन जाणे सहज शक्य आहे ही गाडी चार्ज होण्यासाठी चार तासाचा अवधी लागतो चार तासांमध्ये गाडी पूर्णपणे चार्ज होऊन 90 किलोमीटर पर्यंत चालते. घरात वापरत असलेल्या कोणत्याही इलेक्ट्रिक लाईट पॉइंटवरून आपण ती चार्ज करू शकतो. या गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामध्ये असलेली बॅटरी ही काढत्या येण्याजोगी आहे. म्हणजेच ती काढून नेऊन घरात देखील किंवा जिथे चार्जिंग पाॅईट आहे तेथे घेऊन जाऊन चार्ज देखील करता येऊ शकते.

     या गाडीला धमाका ऑफर सोबतच चार हजार रुपये किमतीचे ॲक्सेसरीज मोफत दिली जाणार आहे. गाडी खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया अतीशय साधी असून 0 डाऊन पेमेंट वर गाडी उपलब्ध आहे. कमीत कमी कागदपत्रे व त्वरित कर्ज उपलब्ध करुन देण्याची सुविधा असल्याने आपण तात्काळ या गाडीचे मालक बनू शकता. ही गाडी ऑरेंज, ग्रीन, व्हाइट, ब्राऊन या नवीन रंगात देखील उपलब्ध आहे. बुकिंग करून तात्काळ डिलिव्हरी भेटणार असल्याने गाडी कधी येणार ही वाट पाहण्याची आवश्यकता नाही. या गाडीला 3 वर्ष बॅटरी वाॅरंटी असणार आहे. 

     आजच्या वाढत्या महागाईच्या काळामध्ये अतिशय परवडणारी व फायदेशीर अशी ही गाडी आहे. आतापर्यंत ही गाडी खरेदी केलेले समाधानी ग्राहक हेच या गाडीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. लोणावळा शहरामध्ये पाच व सहा एप्रिल रोजी मावळा पुतळा चौक या ठिकाणी या गाडीचे विक्री प्रदर्शन सुरू आहे. त्यानंतर वलवण गावातील मोटो प्लेस या शोरूम मध्ये आपणास ही गाडी खरेदी करण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

अधिक माहितीसाठी - 9503436332 / 7757950312 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मोटो प्लेसचे दुर्वेश जगदाळे यांनी केले आहे.


इतर बातम्या