Breaking news

सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

लोणावळा : सिंहगड तांत्रिक शिक्षण संस्थेच्या लोणावळा संकुलात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

     कार्यक्रमाची सुरुवात लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये समूहगायन, एकल गायन, कविता वाचन आणि शायरी सादरीकरण अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. देशभक्तीपर गीत, कविता आणि शायरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली.

      यानंतर विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी ‘हर घर तिरंगा’ रॅली काढून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा संदेश दिला. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, एस. के. एन. एस. आय. टी. एस. चे के. पी. पाटील, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्राचार्या डॉ. रुकसाना पिंजारी, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशनच्या संचालिका सौ. साधना आवटे, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्राचार्य पी. के. जावळे, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य बी. ए. शिंगाडे तसेच सिंहगड पब्लिक स्कूलचे डॉ. एन. के. मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.

        या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि व राष्ट्रध्वजाविषयी आदराची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष दबडे आणि प्रा. एस. एस. पाटील तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

इतर बातम्या