पुणे जिल्ह्यात 15 जुन पर्यत लाॅकडाऊन कायम - जिल्हाधिकारी पुणे

लोणावळा : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या अद्याप नियंत्रणात आलेली नसल्याने जिल्ह्यात 15 जुन पर्यत लाॅकडाऊन कायम ठेवण्यात आला असल्याचा आदेश पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी आज पारित केला आहे. या आदेशानुसार मागील काळात सुरू असलेली अत्यावश्यक सेवेतील व वेळोवेळी मान्यता दिली गेलेली दुकाने ही सकाळी 7 ते 11 या काळात खुली राहणार आहेत.
पुणे शहर व पिंपरी चिंचवड भागात दुकाने उघडण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून जीवनावश्यक सेवे व्यतिरिक्त अन्य दुकाने उघडण्यासाठी मुबा देण्यात आली असली तर ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व छावनी परिसरात लाॅकडाऊन कायम असणार आहे. आज दिवसभर दुकाने उघडण्याच्या वेळेवरून लोणावळा शहरात व मावळात उलटसुलट चर्चा होती. ह्या आदेशाने त्याला पुर्णविराम लागला असून मागील 13 मे च्या आदेशाला 15 जुन पर्यत मुदतवाढ देण्यात आल्याने मावळ तालुक्यासह लोणावळा शहर व ग्रामीण भागातील केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 ह्याच काळात उघडी राहणार आहेत.