Breaking news

आनंदवार्ता l लोणावळ्यातील बाल कवीयत्री मृण्मयी गणेश काळे हिला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

लोणावळा : लोणावळा शहरालगत असलेल्या डोंगरगाव वाडी येथील बाल कवीयत्री कु. मृण्मयी गणेश काळे हिला नुकताच अनुभूती जनसेवा हा राज्यस्तरीय पुरस्कार मुंबई येथील पत्रकार भवनात देऊन गौरवण्यात आले.

      टु. एम. जी क्रिएशन्स इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या वतीने 29 डिसेंबर रोजी हा राज्यस्तरीय पुरस्कार मुंबई येथील पत्रकार भवनात कर्नल रवींद्र पाटील, डॉक्टर सुभद्रा निल, अभिनेता अभंष  कुमार, ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आत्तापर्यंत मृण्मयी हिला मिळालेला हा 18 वा पुरस्कार आहे. याविषयी बोलताना, मृण्मयी म्हणाली, माझी या पुरस्कारासाठी निवड करून मला सन्मानित केल्याबद्दल आयोजकांचे व खान सरांचे मी आभार मानते. मी या सर्व पुरस्काराचे श्रेय माझे आई-बाबांना व माझे गुरु, स्वामींना देते.

इतर बातम्या