Breaking news

मराठी पत्रकार संघाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी रामदास वाडेकर, तर सचिवपदी गणेश विनोदे

वडगाव मावळ : मराठी पत्रकार संघाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी रामदास वाडेकर (मावळ सत्य) आणि सचिवपदी गणेश विनोदे (पुढारी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सुदेश गिरमे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच वडगाव मावळ येथे अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला. 

     ​हा सोहळा मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

​एकमताने निवड आणि नियुक्तीपत्रांचे वाटप

​मावळ तालुका कार्यकारिणीच्या निवडीसाठी इच्छुकांकडून अर्ज व नावे मागविण्यात आली होती. प्राप्त झालेल्या अर्जांवर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नावांना एकमताने मान्यता देण्यात आली. या पदग्रहण सोहळ्यात सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

​नूतन तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

अध्यक्ष: रामदास वाडेकर (मावळ सत्य), ​सचिव: गणेश विनोदे (पुढारी), ​कार्याध्यक्ष: अतुल पवार (सा. अंबर), उपाध्यक्ष: जगन्नाथ काळे (पुढारी) व संकेत जगताप (लोकमत), ​सहसचिव: विशाल कुंभार (प्रभात), ​खजिनदार: नितीन तिकोणे (लोकमत), ​प्रकल्पप्रमुख: विशाल विकारी (मावळ माझा) व गणेश दुडम (चालता बोलता)

 कार्यकारिणी सदस्य : सचिन शिंदे (हॅलो मावळ), बंडू येवले (महाराष्ट्र टाइम्स), रेश्मा फडतरे (महाराष्ट्र लाईव्ह १), अंकुश दाभाडे (वृत्त छायाचित्रकार), प्रशांत पुराणिक (सा. अंबर), संजय हुलावळे (प्रभात), दक्ष काटकर (सकाळ), सुभाष भोते (पुण्यनगरी), भारत काळे (सकाळ) आणि माऊली वाघमारे (बारामती लाईव्ह).

​पदसिद्ध सदस्य व सल्लागार मंडळ

पदसिद्ध कार्यकारिणी सदस्य : मनोहर दाभाडे (अध्यक्ष, तळेगाव दाभाडे - प्रभात), विलास भेगडे (अध्यक्ष, प्रेस फाऊंडेशन - लोकमत), रमेश कांबळे (अध्यक्ष, देहूरोड - पुढारी), सतीश गाडे (अध्यक्ष, वडगाव मावळ - नवराष्ट्र), चेतन वाघमारे (अध्यक्ष, कामशेत - प्रभात) आणि रवि ठाकर (अध्यक्ष, पवनानगर - प्रभात).

मार्गदर्शक व सल्लागार मंडळ: सुरेश साखवळकर (सा. अंबर), बबनराव भसे (सकाळ), सोनबा गोपाळे (केसरी), ज्ञानेश्वर वाघमारे (सकाळ), विवेक इनामदार (मावळ ऑनलाइन), सुदेश गिरमे (लोकमत) आणि निखिल कविश्वर (लोणावळा).

​पत्रकारांच्या हक्कासाठी संघटित होण्याचा निर्धार

​या पदग्रहण सोहळ्याला तालुक्यातील अनेक ज्येष्ठ आणि निष्ठावंत पत्रकार उपस्थित होते. यात तालुका सल्लागार ज्ञानेश्वर वाघमारे, तळेगाव दाभाडे प्रेस फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे, लोणावळा शहर अध्यक्ष नितीन तिकोणे, पवन मावळ अध्यक्ष रवि ठाकर, कामशेत अध्यक्ष चेतन वाघमारे यांच्यासह राधाकृष्ण येणारे, तात्यासाहेब धांडे, बाळासाहेब भालेकर, दिलीप कांबळे, ज्ञानेश्वर ठाकर, अनिल घारे, विशाल कुंभार, संदीप गाडेकर, संजय हुलावळे, सुभाष भोते, आकाश कानापुरम, महेश भागीवंत, अमित भागिवंत, अंकुश दाभाडे, श्रीकांत चेपे, राहुल सोनवणे, सोपान येवले, मंगेश आखाडे, चंद्रकांत असवले आदी मान्यवर उपस्थित होते.

​नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील पत्रकारांच्या विविध अडचणी व प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे व ताकदीने काम करण्याचा संकल्प या वेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या