जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेसावे येथे ‘द डिजिटल ग्रुप’ कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोणावळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेसावे (ता. मावळ, जि. पुणे) येथे ‘द डिजिटल ग्रुप’ (The Digital Group) चे CEO आदित्य शर्मा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस, छत्र्या, शैक्षणिक साहित्य तसेच शाळेसाठी ६ व्हीलचेअर्स भेट देण्यात आल्या.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक त्र्यंबक आहेर, सहशिक्षिका प्राजक्ता जाधव व रुपाली हरिहर उपस्थित होत्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ नामदेव शिरसट, उपाध्यक्ष दिनेश शिरसट तसेच अनिल शिरसट आणि मल्हारी गायकवाड उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्य, स्पोर्ट्स ड्रेस आणि छत्र्यांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. उपस्थितांनी The Digital Group आणि CEO आदित्य शर्मा यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठे प्रोत्साहन मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
























