Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळ्याचा पाऊस 200 इंचाच्या उंबरठ्यावर - 23 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 19 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरातील पाऊस 200 इंचाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. लोणावळा शहरामध्ये जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे लोणावळा शहरात पावसाने 200 इंचाचा टप्पा गाठला आहे. लोणावळा शहरामध्ये 23 ऑगस्ट रोजी 24 तासात 19 मिमी (0.75 इंच) पावसाची नोंद झाली. 22 ऑगस्ट रोजी शहरामध्ये पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या. 23 ऑगस्ट रोजी मात्र पावसाच्या प्रमाणात काहीशी घट झाली व रिमझिम पाऊस दिवसभर सुरू राहिला.

लोणावळा शहरामध्ये यावर्षी आज अखेरपर्यंत 5074 मिमी (199.76 इंच) एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेरपर्यंत लोणावळा शहरांमध्ये 5039 मिमी (198.39 इंच) एवढा पाऊस झाला होता.

इतर बातम्या