Breaking news

भुशी गावच्या स्मशानभूमीजवळ ३१ वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

लोणावळा : भुशी गावच्या स्मशानभूमीजवळ एका ३१ वर्षीय युवकाने झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१८ जुलै) रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. अमन तब्बी वासू (वय ३१, रा. रामनगर, भुशी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार १८ जुलै रोजी सकाळी भुशी गावच्या स्मशान भूमीजवळील झाडाला एका इसमाने गळफास घेतल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांना मिळाली. 

      झाडाच्या खाली एक दुचाकी गाडी (मोटारसायकल) उभी असलेली पोलिसांना आढळून आली. प्राथमिक तपासानुसार, अमन याने आपली दुचाकी झाडाखाली उभी केली, त्यावर उभे राहून झाडाच्या फांदीला ओढणी बांधली आणि गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले.

या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विष्णू फटांगडे करत आहेत.

इतर बातम्या