Breaking news

महिंद्रा अँड महिंद्रामध्ये तीन विद्यार्थ्यांची निवड; सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा गौरव

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट्स, लोणावळा कॅम्पसच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना देशातील अग्रगण्य उद्योगसमूहांमध्ये रोजगाराच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होत आहेत. याच अनुषंगाने सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील बॅच 2026 मधील दोन विद्यार्थ्यांची Mahindra & Mahindra मध्ये 5.10 लाख वार्षिक वेतन पॅकेज (CTC) वर निवड झाली आहे.

      इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभागातील प्रज्वल मावकर, मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील गौरी पाटील तसेच इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील विशाल पाचे यांनी आपल्या गुणवत्ता, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर हे यश संपादन केले आहे. Mahindra & Mahindra ही भारतातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय वाहन व अभियांत्रिकी कंपनी असून ऑटोमोबाईल, कृषी उपकरणे, व्यावसायिक वाहने, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि शाश्वत विकासासाठी कंपनीची विशेष ओळख आहे.

        या यशाचे श्रेय संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले आणि उपाध्यक्ष डॉ. रचना नवले अष्टेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला देण्यात आले. त्यांच्या विद्यार्थी-केंद्रित धोरणांमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगाराच्या संधी सातत्याने वाढत आहेत. तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. मयूर राऊत यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. विद्यार्थ्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. शिवाजी देसाई, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य एस एम गायकवाड तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांनी त्याच्या मेहनतीचे कौतुक करत त्याला उज्ज्वल व यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या