Accident News : शिलाटणे गावातील शिवभक्तांच्या टेम्पोला कंटेनरची धडक; 30 - 35 जण जखमी

लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या शिलाटणे गावातील शिवभक्तांच्या टेम्पोला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. रावेत जवळ आज सकाळी हा अपघात झाला. जखमींपैकी 4 ते 5 जणांची प्रकृती गंभिर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. शिलाटणे गावातील तरुण मुले शिवज्योत आणण्यासाठी मल्हार गडावर गेले होते. शिवज्योत घेऊन परत गावाकडे येत असताना आज सकाळी वाकड जवळ हा अपघात झाला. जखमींवर पवना रुग्णालय, पायोनिर रुग्णालय व रावेत येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवभक्तांचा अपघात झाल्याने सर्वांनी संताप व्यक्त केला असून बेजाबदारपणे वाहन चालविणार्या कंटेनर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.