आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक मावळात संपन्न

लोणावळा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महत्त्वपूर्ण आढावा बैठक वडगाव मावळ या ठिकाणी रविवारी 15 जून रोजी संपन्न झाली. जिल्हा परिषदा पंचायत समिती व नगरपरिषद नगरपंचायती या निवडणुका शिवसेना पक्ष पूर्ण ताकतीने लढवणार आहे याकरिता सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कामास सुरुवात करावी अशा प्रकारच्या सूचना शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन भाऊ अहिर यांनी या बैठकीमध्ये मावळ तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, मावळ तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख पुणे जिल्हा शादान चौधरी, पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, युवासेना पुणे जिल्हा अधिकार अनिकेत घुले, महिला आघाडी जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, उपजिल्हा संघटिका संगिता सोनवणे, तालुका सल्लागार प्रमुख मारूती खोले, युवती सेनेच्या सना चौधरी, अवजड वहातुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेने, युवासेना तालुका अधिकारी उमेश गावडे, उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, मावळ तालुका संघटक अशोक निकम, शांताराम भोते, किसन तरस, तालुका समन्वयक रविंद्र गायकवाड, शोभिनाथ भोईर, भरत भोते, मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, विशाल दांगट, लोणावळा शहरप्रमुख परेश बडेकर, वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते, तळेगाव शहरप्रमुख शंकर भेगडे, देहुरोड शहरप्रमुख संदिप बालघरे, लोणावळा शहर समन्वयक जयवंत दळवी जेडी,उपशहरप्रमुख नागेश दाभाडे, लोणावळा शहर प्रवक्ते अनिल कडु, लोणावळा शहार सल्लागार रामभाऊ थरकुडे, ज्ञानदेव कदम, विभागप्रमुख क्रिशना शिळवणे, प्रकाश चव्हाण, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, कुणाल सपकाळ, धिरज घारे, युवासैनिक सुमित भोसले आदी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.