मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवले शिक्षणग्राम अनाथ आश्रमात केक कापून अन्नदान

लोणावळा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे तसेच मावळ तालुका मनसे अध्यक्ष श्री. अशोक वसंतराव कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त देवले येथील शिक्षणग्राम अनाथ आश्रमात केक कापून आणि अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन सुनील सावळे आणि शिल्पा सावळे यांनी केले होते. या माध्यमातून अनाथ मुलांना आनंद देण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला मावळ तालुका मनसे अध्यक्ष अशोक कुटे, लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले, शहर प्रवक्ते अमित भोसले, उपाध्यक्ष दिनेश कालेकर, माजी तालुका उपाध्यक्ष रमेश म्हाळसकर, तालुका उपाध्यक्ष अनिल लायगुडे, मंगेश फाटक, निर्मल आंबेकर, अभिजीत फासगे, निलेश लांडगे, संदीप बोभाटे, श्रेयस कांबळे, कैवल्य जोशी, जुबेर मुल्ला, रामदास चतुर, आकाश रणपिसे यांची उपस्थिती होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते देविदास आडकर आणि देवले शिक्षणग्रामचे श्री. अल्हाट टपाले सरही या प्रसंगी उपस्थित होते.