Breaking news

करिअरची सुवर्णसंधी l लोणावळ्यातील प्रसिद्ध 'कैवल्यधाम' संस्थेत निसर्गोपचार परिचारिका कोर्स जून महिन्यापासून सुरू होणार (Naturopathy Treatment Attendant Course)

लोणावळा : जागतिक स्तरावर योग आणि आरोग्य क्षेत्रात नावाजलेल्या लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेत (Kaivalyadhama) येत्या जून २०२६ पासून 'निसर्गोपचार परिचारिका कोर्स' (Naturopathy Treatment Attendant Course) सुरू होत आहे. निसर्गोपचार आणि वेलनेस क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

कोर्सची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लिक करा

एक वर्षाचा सखोल अभ्यासक्रम

हा अभ्यासक्रम पूर्णतः एक वर्षाचा असून, यामध्ये विद्यार्थ्यांना निसर्गोपचाराची मूलभूत तत्त्वे आणि विविध उपचार पद्धतींचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. कालावधी पूर्ण केल्यानंतर यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना संस्थेच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

कोर्सची प्रमुख वैशिष्ट्ये :

प्रॅक्टिकल ट्रेनिंग : केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कामाचे व्यावहारिक ज्ञान (Practical Training) दिले जाईल.

समग्र आरोग्य शिक्षण : निसर्गोपचार तत्त्वे, विविध उपचार पद्धती, आहारशास्त्र आणि जीवनशैलीवर आधारित आरोग्य थेरपीचे विशेष शिक्षण.

कौशल्य विकास : रुग्णसेवेसाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

कोणाला सहभागी होता येईल?

१. वेलनेस आणि आरोग्य क्षेत्रात व्यावसायिक करिअर करू इच्छिणारे तरुण.

२. नैसर्गिक उपचार पद्धतींची आवड असलेले व्यक्ती.

३. वेलनेस सेंटर्स किंवा निसर्गोपचार केंद्रांमध्ये काम करण्याची इच्छा असलेले उमेदवार.

प्रवेशासाठी अटी व प्राधान्य:

या कोर्ससाठी जागा मर्यादित असून स्थानिक नागरिकांना (लोणावळा व मावळ) प्रवेशात प्राधान्य दिले जाणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करणारा प्रशिक्षणार्थी शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या पूर्णपणे 'फिट' असणे आवश्यक आहे. या कोर्सची वार्षिक फी 10 हजार रुपये असणार आहे.

कोर्सची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लिक करा

संपर्क आणि नोंदणी :

इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन कैवल्यधाम संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक नागरिक www.kdham.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा कार्यालयीन वेळेत खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात : संपर्क : +91 7262026878 / 02114 - 273001

निसर्गोपचाराच्या माध्यमातून आरोग्य सेवा क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असून, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या

रायवूड भागामध्ये विकासाच्या नावाखाली रस्ते खोदाई; पंधरा दिवसापासून काम बंद, सोमवारपासून या भागातील शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर