Breaking news

MLA SUNIL SHELKE l आमदार सुनील शेळके यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्य पदी नियुक्ती

लोणावळा : मावळचे आमदार सुनील शेळके यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे अवर सचिव सुषमा कांबळी यांनी याबाबतचा शासन आदेश 29 जानेवारी 2025 रोजी पारित केला आहे. 

       नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघांमधून आमदार सुनील शेळके हे विजयी झाले होते. आता त्यांची या आदेशान्वये पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. त्याच सोबत राहुल कुल यांची देखील नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यामधील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित केला जातो. तसेच जिल्हा नियोजन समितीचे आर्थिक बजेट देखील मोठे असते, त्यामुळे या समितीवर सदस्य असणे हा विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग ठरतो. मागील पंचवार्षिक काळदेखील आमदार सुनील शेळके यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मावळ मतदार संघामध्ये आणला होता. 

इतर बातम्या