मावळातील हभप दिलीप महाराज खेंगरे यांची शिवसेना पक्षाच्या शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना पुणे जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती

लोणावळा : मावळ तालुक्यातील कीर्तनकार प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध असलेले हभप दिलीप महाराज खेंगरे यांची शिवसेना शिंदे पक्षाच्या शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना पुणे जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये खासदार श्रीकांत शिंदे व संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेश अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हभप दिलीप महाराज खेंगरे यांना नियुक्तीपत्र दिले आहे. सदर नियुक्तीचा कालावधी हा एक वर्षाचा आहे. या पदाच्या माध्यमातून हिंदुरह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्व. आनंद दिघे यांचे शिकवण व हिंदुत्ववादी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवत शिवसेना पक्ष वाढीसाठी व हिंदुत्ववादी विचाराचा प्रचार प्रसारासाठी कार्य करावे असे नमूद करण्यात आले आहे.