Breaking news

वाकसई विकास सोसायटीच्या चेअरमन पदी हभप काशिनाथ धोंडु शेलार तर व्हाईस चेअरमन पदी श्री विठ्ठल पांडुरंग केदारी यांची बिनविरोध निवड

लोणावळा : वाकसई विकास सोसायटीच्या चेअरमन पदी हभप काशिनाथ धोंडु शेलार तर व्हाईस चेअरमन पदी श्री विठ्ठल पांडुरंग केदारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सोसायटी सदस्यांमध्ये ठरल्या प्रमाणे चेअरमन खंडु येवले तर व्हाईस चेअरमन धोंडीबा केदारी यांनी राजिनामा दिल्याने हि निवडणुक घेण्यात आली. त्यात चेअरमन पदासाठी ह.भ.प. काशिनाथ धोंडु शेलार तर व्हाईस चेअरमन पदासाठी विठ्ठल पांडुरंग केदारी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे निवडणुक अधिकारी यांनी घोषीत केले.

निवडणुक अधिकारी म्हणुन एम.एम.नरोटे व सचिव म्हणुन सचिन भानुसघरे यांनी काम पाहिले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश सचिव अमोल केदारी, मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या उपसभापती सुनिता केदारी, जेष्ठ संचालक भरत येवले, सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपत भानुसघरे, वाकसईचे उपसरपंच सुरेश केदारी, सदस्य सुर्यकांत शेलार यांच्या सह संचालक मंडळ व ग्रामस्त उपस्थित होते.

इतर बातम्या