SSC RESULT l लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के; ऋतुजा पोकळे शाळेत प्रथम

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचा यंदाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मागील काही वर्षांपासून ची 100% निकालाची परंपरा या वर्षी देखील शाळेने कायम ठेवले आहे. ऋतुजा दिलीपराव पोकळे हिने 79.20 % गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. दिव्या सिकंदर वाठोरे हिने 70.80 % गुण मिळवत शाळेत द्वितीय क्रमांक मिळवला. लावण्या कल्याण धनी हिने 61.20 % गुण मिळवत शाळेत तिसरा क्रमांक मिळवला आहे. लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालया मधून 14 विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची शालांत बोर्ड परीक्षा दिली होती. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लोणावळा नगरपरिषद माध्यमिक शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न गटातील असतात. शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण बलकवडे व इतर शिक्षक या सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन या विद्यार्थ्यांना दहावीचा परिपाठ दिला होता. शिक्षकांनी घेतलेल्या अभ्यास व विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत यामुळेच हे शंभर गुणिले शाळेला प्राप्त झाले आहे. मागील काही वर्षांपासून लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचा निकाल हा 100% लागत आहे. या यशाचे लोणावळा नगर परिषदेचे व शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी व शाळा समिती अध्यक्ष सदस्य पालक सदस्य यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.