मावळ माझा न्यूजच्या वर्धापनदिनानिमित्त लोणावळा शिवसेना परिवाराच्या वतीने वृक्षारोपण
लोणावळा : मावळ माझा न्यूजच्या वर्धापनदिनानिमित्त लोणावळा शहरात लोणावळा शिवसेना परिवाराच्या वतीने ठोंबरेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. शिवसेना पक्षाच्या वतीने दरवर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष पंधरवडा राबविण्यात येतो. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून लोणावळा शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रकल्प प्रमुख यांचा वाढदिवस व त्यांच्याच मावळ माझा न्युज या डिजिटल मीडियाच्या वर्धापन दिनाच्या निमित्त हा पर्यावरण पूरक उपक्रम शिवसेना लोणावळा परिवाराच्या वतीने राबवण्यात आला आहे.
ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पुणे जिल्हा माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे व मावळ माझा डिजिटल वृत्तवाहिनीचे प्रमुख विशाल विकारी, माजी विभागप्रमुख ज्ञानदेव जांभूळकर, ज्येष्ठ शिवसैनिक शंकर जाधव, जितेंद्र राऊत, सुनिल इंगुळकर, दीपक महाराज हुंडारे, सहदेव साठे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य मारुती राक्षे, सुनिल साठे, युवा सेनेचे मावळ तालुका संघटक शामराव सुतार, युवा सेनेचे सतीश गोनते, अजय ढम, कुमारी आद्विका हुंडारे, कु. मुद्रा ढम, कु. काश्मीराज खराडे, कु. नैनिका खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच श्री विशाल विकारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.



















