Breaking news

लोणावळा शहरात राष्ट्रीय एकता पोलीस बाईक रॅलीचे जल्लोषात स्वागत

लोणावळा : राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, पाॅंडेचरी, अंदमान व निकोबार या राज्यातील सुमारे ७५ पोलीस नॅशनल मोटरसायकल रॅली काढत मुंबईकडे रवाना झाले आहेत. या राष्ट्रीय एकता पोलीस बाईक रॅलीचे लोणावळा शहरात वाहतूक पोलिसांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. लोणावळा शहरातील नागरिक व शाळा तसेच महाविद्यालयांचे विद्यार्थी यांनी देखील रस्त्याच्या कडेने उभे राहत फुलांची उधळण या बाईक रॅलीवर करत त्यांचे स्वागत केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुजरात येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस पर आयोजित करण्यात येत आहे या निमित्ताने या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या बाईक रॅलीच्या निमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा व व्यसनमुक्तीचा संदेश नागरिकांना देण्यात आला. सशक्त भारत व्यसनमुक्त भारत सुदृढ भारत व्यसनमुक्त भारत अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

इतर बातम्या