Breaking news

महत्वाची बातमी l 23 ऑक्टोबर रोजी लोणावळा शहरातील शुक्रवारचा आठवडे बाजार बंद राहणार

लोणावळा : लोणावळा शहरात 23 ऑक्टोबर रोजी शुक्रवारचा आठवडे बाजार बंद राहणार आहे. महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश आज 22 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाल्यानंतर लोणावळा नगर परिषदेने आठवडे बाजार बंद ठेवण्याचा तातडीचा आदेश पारित केला आहे. लोणावळा शहरातील नागरिकांनी व व्यापारी वर्गाने याची नोंद घ्यावी असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी केले आहे.


इतर बातम्या