लोणावळा महायुतीकडून पदवीधर उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव व शिक्षक उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा जोरदार प्रचार सुरू
लोणावळा : पुणे पदवीधर मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर स्मिता योगेश जाधव व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा प्रचार लोणावळा शहरामध्ये जोमात सुरू करण्यात आला असून महायुतीचे सर्व घटक पक्ष या प्रचारामध्ये सक्रिय सहभागी झाले आहेत. महायुतीच्या प्रचाराची माहिती व मतदारांना आवाहन करण्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने लोणावळा शहरात पत्रकार परिषद घेत सर्व मतदारांना दोन्ही उमेदवारांसमोर पसंती क्रमांक एक नोंदवत त्यांना भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोणावळा शहराचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवी पोटफोडे, शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख संजय भोईर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष कमलशील म्हस्के, भाजपाचे माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी, अरुण लाड, प्रदेश सदस्य आशिष बुटाला, शिवसेना महिला आघाडी प्रमुख मनीषा भांगरे, नगरसेवक जाकीर खलिफा, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष भारत चिकणे, पराग राणे, माजी उपनगराध्यक्ष मारुती दादा तिकोने, समीर इंगळे, जयप्रकाश परदेशी, विशाल पाठारे, नरेश घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेनंतर महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लोणावळा शहरातील शाळांमध्ये भेट देत शिक्षक मतदारांना उमेदवारांचे परिचय पत्रक वाटप केले तसेच पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांना डॉक्टर स्मिता योगेश जाधव यांच्या समोरील पसंती क्रमांक एक नोंदवत त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
महायुतीचे पदाधिकारी सर्व मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत असून मतदानाच्या दिवशी 100% मतदान करून घेण्याचा आमचा मानस असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महायुतीचे सर्व घटक पक्ष व त्यांचे पदाधिकारी या प्रचार प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी झाले असून निश्चितच महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
















