Breaking news

गडचिरोलीत शिवसेनेचा भव्य मेळावा; उद्धव ठाकरेंच्या आदेशाने ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ

गडचिरोली : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली येथे शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी अत्यंत उत्साहात पार पडला.

     शिवसेना नेते व सचिव मा. खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्तकमलाने जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख श्री. महेश केदारी यांच्यासह पक्षाचे राज्यातील व स्थानिक पातळीवरील प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या मेळाव्यास गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून आलेले तालुकाप्रमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवा सेना आणि पक्षाचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे परिसर भगवामय झाला होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यात पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियानाला गती देण्यासाठी हे संपर्क कार्यालय महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी पक्षाशी आणि ठाकरेंच्या विचारांशी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.

इतर बातम्या