Breaking news

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खाजगी प्रवासी बस जळून खाक

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर एक खाजगी प्रवासी बस अचानक लागलेल्या आगीत जाळून खाक झाली आहे. ही घटना पनवेल जवळ किमी 16 येथे सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पुणे लाईनवर घडली.

       मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवासी घेऊन जात असलेली एक खाजगी प्रवासी बस किमी 16 येथे आली असता अचानक बसला आग लागली. सुदैवाने चालक व सर्व प्रवासी गाडीतून खाली उतरल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या दुर्घटनेत बस जळून खाक झाली आहे. बसला आग लागल्याची माहिती समजतच आयआरबी कंपनी व देवदूत यंत्रणा यांचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत त्यांनी तातडीने आग विझवली. 

इतर बातम्या