Sinhgad Institute l सिबाका विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड कॉम्प्युटर अप्लिकेशन (SIBACA), लोणावळा येथील विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये निवड मिळवून संस्थेचा गौरव वाढविला आहे.
श्री. संकेत उद्धव लांडगे (2024-26 बॅच) यांची Akshayakalpa Farms & Foods Pvt. Ltd. मध्ये Senior Brand Ambassador पदासाठी ₹5.70 लाख वार्षिक वेतन पॅकेज (CTC) वर निवड झाली आहे.
तसेच कु. तन्वी संजय काळमेघ (2024-26 बॅच) हिची Tata Consultancy Services (TCS) मध्ये Management Trainee पदासाठी ₹5.88 लाख वार्षिक वेतन पॅकेज (CTC) वर निवड झाली आहे.
Akshayakalpa Farms & Foods Pvt. Ltd ही भारतातील अग्रगण्य सेंद्रिय दुग्धजन्य व अन्न उत्पादने निर्मिती करणारी कंपनी असून शाश्वत शेती, पशुकल्याण आणि रसायनमुक्त अन्न उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तर TCS ही भारतातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय आयटी सेवा व सल्लागार कंपनी असून डिजिटल तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर विकास, क्लाउड कम्प्युटिंग आणि व्यवसाय समाधान क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत आहे.
ही कामगिरी त्यांची निष्ठा, कठोर परिश्रम आणि शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील उत्कृष्टतेप्रती असलेली त्यांची कटिबद्धता दर्शवते. तसेच, विद्यार्थ्यांना करिअरच्या दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेल'ने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांवरही ही बाब प्रकाश टाकते.
या यशाचे श्रेय संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले आणि उपाध्यक्ष डॉ. रचना नवले अष्टेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला देण्यात आले. त्यांच्या विद्यार्थी-केंद्रित धोरणांमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगाराच्या संधी सातत्याने वाढत आहेत. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल तसेच SIBACA च्या डायरेक्टर सौ. साधना आवटे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्य प्रकल्प अधिकारी एसटीईएसचे डॉ. एम. एस. गायकवाड, लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. शिवाजी देसाई, इन्स्टिटयूट डायरेक्टर सौ. साधना आवटे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांनी त्याच्या मेहनतीचे कौतुक करत त्याला उज्ज्वल व यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. SIBACA परिवाराकडून श्री. संकेत उद्धव लांडगे आणि कु. तन्वी संजय काळमेघ यांना या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!






















