Breaking news

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा ३३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

लोणावळा : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा (STES) ३३ वा स्थापना दिन लोणावळा संकुलातील विविध महाविद्यालयांच्या सहभागाने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्थापना दिनानिमित्त संपूर्ण संकुलात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलागुणांसह सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. 

        संस्थापकांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभल्यामुळे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या ३३ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीला सातत्याने नवी दिशा मिळत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले आणि उपाध्यक्ष डॉ. रचना नवले-अष्टेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला आणि नवोपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन मिळत आहे.

या कार्यक्रमास STES चे मुख्य प्रकल्प अधिकारी डॉ. एम. एस. गायकवाड, लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, SIT चे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, SKNSITS चे के. पी. पाटील, SIPS च्या प्राचार्या डॉ. रुकसाना पिंजारी, SIBACA च्या डायरेक्टर सौ. साधना आवटे, SIHMCT चे प्राचार्य पी. के. जावळे, SKNCOE चे प्राचार्य बी. ए. शिंगाडे तसेच सिंहगड पब्लिक स्कूलचे डॉ. एन. के. मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.

       स्थापना दिनाच्या निमित्ताने लोणावळा संकुलातील विविध महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. SIHMCT येथे सकाळी ९.३० वाजता CTC Hall मध्ये Cake Cutting करण्यात आले. त्यानंतर SKNCOET तर्फे SIHMCT च्या Entrance परिसरात सकाळी १० वाजता Cleaning Drive आयोजित करण्यात आली. NBNCOCs तर्फे Corporate Garden येथे सकाळी १०.३० वाजता Tree Plantation उपक्रम घेण्यात आला. यानंतर SIPS येथे Library Reading Hall मध्ये सकाळी ११ वाजता Speech Competition, SPS येथे Auditorium मध्ये सकाळी ११.३० वाजता Painting Competition, तर SIT येथे Mechanical Seminar Hall मध्ये दुपारी १२ वाजता Reel Competition आयोजित करण्यात आली. तसेच SIBACA येथे Reading Hall मध्ये दुपारी १२.३० वाजता Poster Competition आणि SKNSITS येथे IT Seminar Hall मध्ये दुपारी १ वाजता Rangoli Competition घेण्यात आली.

SIT येथे आयोजित ‘क्षणचित्र’ ’26 – Reel Making Competition मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचा आणि तांत्रिक कौशल्याचा प्रभावी आविष्कार सादर केला. या कार्यक्रमात स्वागत व उद्घाटन, वृक्षारोपण, मान्यवरांचा सत्कार, नृत्य सादरीकरण, वारी स्वयंसेवकांचा सत्कार, रील सादरीकरण आणि पारितोषिक वितरण असे विविध उपक्रम पार पडले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.

        STES च्या ३३ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे संपूर्ण लोणावळा संकुलात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व कर्मचारीवर्गानेही या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोणावळा संकुलातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.

इतर बातम्या

15 ऑगस्ट ला जोडून आलेल्या लॉंग वीकेंडला लोणावळ्यात वाहतुकीचे योग्य नियोजन करा; अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवा - नगरसेवक निखिल कवीश्वर यांची लोणावळा शहर पोलिसांकडे मागणी