वाकसई येथील अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करण्याची हिंदू समितीची मागणी
लोणावळा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDA च्या हद्दीतील वाकसई गाव, गट नं. 221, 222, 223 येथे अनधिकृतरित्या करण्यात आलेल्या बांधकामाबाबत PMRDA यांनी दि. 29 जुलै 2026 रोजी 15 दिवसांची नोटीस बजावली होती. आज सदर नोटीसची मुदत संपली असून कोणतीही कारवाई झालेली नाही. अद्यापही सदरचे अनधिकृत बांधकाम काढलेले दिसत नाही .
या पार्श्वभूमीवर हिंदू समिती, लोणावळा शहर व ग्रामीण परिसर च्या वतीने आज लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. त्यांच्यासमवेत हिंदू समिती लोणावळा ग्रामीण परिसरातील सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अनधिकृत बांधकामाबाबत प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई केली नाही तर हिंदू समिती, लोणावळा शहर व ग्रामीण च्या वतीने जिल्ह्यातील सर्व हिंदू संघटनांसह कायदेशीर व लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे यावेळी हिंदू समितीच्या वतीने सांगण्यात आले.



















