लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त स्वर स्पंदन गीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न

लोणावळा : लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त स्वर स्पंदन या जुन्या व नव्या गीतांचा मिलाफ असलेल्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच हॉटेल चंद्रलोक या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमात सारेगमा फेम गायिका रसिका गानू हिने आपल्या सुमधुर आवाजाने जुनी नवी गाणी सादर करून लोणावळ्यातील ज्येष्ठाना मंत्रमुग्ध केले.
ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा मिळावा या उद्देशाने दर वर्षी संघाच्या वतीने मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. संघाच्या 31 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोणावळा शहर अध्यक्ष नासिर भाई शेख, शिवसेना लोणावळा शहर अध्यक्ष संजय भोईर, आधार फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश पाठारे, ज्येष्ठ गायक संजय गोळपकर, राजेश मेहता, ज्येष्ठ समाजसेवक धीरुभाई कल्याणजी, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी, एम एन न्यूजचे संपादक संजय पाटील, मावळ वार्ता उप संपादक प्रदिप वाडेकर, माजी नगरसेवक दत्ता येवले, माजी नगरसेवक संजय गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
मंगल राणे यांनी गणेश वंदना व शारदा आगरवाल, ज्योती रांगणे यांनी संघाची प्रार्थना गायली. पहलगाम येथील मृतांना श्रध्दांजली अर्पण करून गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सा रे गा मा पा व इंडियन आयडॉल फेम प्रमुख गायिका रसिका गानु, सुप्रसिध्द गायक प्रविर सरखेल, चिन्मय जगधनी, हँडसोनिक वादक संदीप मालुसरे, सिंथेसायजर वादक अजित चव्हाण, गिटार वादक आकाश सताने, तबला वादक मनोज कदम, यांच्या हिंदी मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रम सद्गुरू सदन व स्वर स्पंदन च्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गायक कलाकार व उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष पांडुरंग तिखे व सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी खुप मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी शिरसकर यांनी केले, आभार पांडुरंग तिखे यांनी व्यक्त केले.