सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे NSS विभागातर्फे संशोधन कार्यशाळा आणि निरोप समारंभाचे यशस्वी आयोजन

लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय संशोधन पद्धती मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी एकूण 20 शोधनिबंध तयार केले, जे IJ-SART या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले.
संस्थेने 2025 पासआउट बॅचमधील NSS स्वयंसेवकांसाठी निरोप समारंभाचे आयोजन केले. या समारंभात अंतिम वर्षातील स्वयंसेवक आणि मार्गदर्शकांचा त्यांच्या NSS मधील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या वर्षातील NSS स्वयंसेवकांना NSS पूर्णता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमात कार्यशाळेत सहभागी असलेल्या गटांनी तयार केलेल्या शोधनिबंधांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय ‘लोहगड संवर्धन शिबिर’ आणि राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभाग घेतलेल्या स्वयंसेवकांनाही विशेष प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड आणि प्राचार्य डॉ. एस. डी. बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष दबडे, प्रा. सुलक्षणा पाटील, विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, डीन अकॅडमिक्स डॉ. डी. एस. मंत्री, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. एस. एल. म्हेत्रे, मुख्य ग्रंथपाल डॉ. रूपाली फुले आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन NSS स्वयंसेवकांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडले. समारंभाच्या निमित्ताने “सेवाभाव आणि समाजासाठी समर्पित वृत्तीचा वारसा जपत ठेवावा” हा प्रेरणादायी संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आला.