Breaking news

महत्वाची बातमी | खंडाळा येथे ३ मेपासून HSRP नंबर प्लेट फिटमेंट सेंटर सुरू होणार

लोणावळा : भारत सरकारने लागू केलेली HSRP (High Security Registration Plate) प्रणाली ही वाहने अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही प्लेट वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वापरण्यात येते. महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 30 जून 2025 पर्यंत सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. विशेषतः 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी ही अट लागू आहे.

लोणावळा व परिसरातील वाहनधारकांना या सेवेसाठी तळेगाव किंवा सोमाटणे येथे जावे लागत असल्यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होत होते. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र रिक्षा पंचायत – लोणावळा शहर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून खंडाळा येथे अधिकृत HSRP फिटमेंट सेंटर मंजूर करून घेतले आहे.

हे नवीन सेंटर 3 मे 2025 पासून कार्यान्वित होत असून, खंडाळा द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली, शारदा हॉटेलसमोर हे स्थापन करण्यात आले आहे. वाहनधारकांनी लवकरात लवकर आपली HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी संपर्क:

  • आनंद सदावर्ते – 93724 23227
  • विनय बच्चे – 86982 01111
  • भगवान घनवट – 98908 01198
  • प्रविण गायकवाड – 80075 85454
  • विकास खेंगरे – 79727 70987
  • भाऊ शिवेकर – 88057 71414
  • चंद्रकांत बालगुडे – 90494 32050
  • वसिम खान – 98237 73332
  • संजय डेंगळे – 98227 79003
  • सत्तार शेख – 95613 27825
  • प्रकाश मातेरे – 92840 42747
  • राजेंद्र जाधव – 96896 22322

इतर बातम्या