Breaking news

Lonavala News l लोणावळ्यात भरधाव स्कॉर्पिओची दोघांना धडक; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

लोणावळा : लोणावळ्यातील हॉटेल मिस्टी मेडोजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव स्कॉर्पिओने रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसलेल्या दोघांना जोरात धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. 29 जून रोजी रात्री 7.40 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मोटार चालक हा दारुच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

     अनिल सुर्यकांत चिंचणकर (वय 53, रा. भैरवनाथ नगर, कुसगाव बु., लोणावळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा पुतण्या कार्तिक उल्हास चिंचणकर (वय 20) व त्याचा मित्र आयान मोहम्मद शेख (वय 17) हे रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसले असताना, स्कार्पिओ (क्र. UP 80 DC 9000) या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. वाहन चालकाने दारू पिऊन वाहन भरधाव व बेफिकिरीने चालवले होते, धडकेनंतर वाहन शेजारच्या लाईटच्या पोलवर आदळले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

      या अपघातात कार्तिक चिंचणकर याचा जागीच मृत्यू झाला, तर आयान शेख गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर स्कार्पिओ कारचा चालक तुलसीराम रामपाल यादव (वय 32, रा. वडाळा पूर्व, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अपघातानंतर स्कॉर्पिओ मोटार पेटवून दिली आहे.


इतर बातम्या