त्रिभाषा धोरणाच्या रद्दीबाबत लोणावळ्यात जल्लोष; मराठी एकजुटीचा विजय !

लोणावळा : राज्य सरकारने महाराष्ट्रातील शाळांवर लादलेले वादग्रस्त त्रिभाषा धोरण अखेर मागे घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 5 जुलैच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्रिभाषा धोरणाचा जी.आर. रद्द करत असल्याची घोषणा तातडीच्या पत्रकार परिषदेत केली. मराठी माणसाच्या एकजुटीपुढे सरकारला अखेर माघार घ्यावी लागली, हे या घटनाक्रमातून स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी लोणावळा शहर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर यांच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि जल्लोष साजरा करत हा ऐतिहासिक निर्णय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कविश्वर, शिवसेना पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, माजी नगराध्यक्ष राजू गवळी, तालुका सल्लागार मारुती खोले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष पप्पूभाई शेख, कार्याध्यक्ष संतोष कचरे, शहरप्रमुख परेश बडेकर, मनसे शहराध्यक्ष निखिल भोसले, प्रवक्ते अमित भोसले, रमेश दळवी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत मराठी एकजुटीचा हा विजय असल्याचे नमूद केले. यावेळी मराठी जनतेने दाखवलेल्या बंधुभावाला सलाम करत, राज्यभरातील मराठी बांधवांचे अभिनंदनही करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहर समन्वयक जयवंत दळवी, युवासेना उपधिकारी अक्षय साबळे, शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, विभागप्रमुख कमर अन्सारी, उपविभागप्रमुख रोमल फर्नांडिस, राम कोकरे, जितेंद्र ठोंबरे, धीरज घारे, सुमित भोसले, सुनिल सोनवणे, संतोष, दिनेश कालेकर, अभिजीत फासगे, सुनील भोंडवे, प्रकाश पिंगळे, आकाश लोंढे, रामभाऊ कोकरे, जुबेर मुल्ला, श्रेयस कांबळे, शुभम पवार, कैवल्य जोशी, किशोर साठे, आकाश सावंत, संतोष येवले, सुभाष रेड्डी, नरेश महामुनी, विजय दांडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.