Breaking news

Lonavala News l लोणावळा एक्सप्रेस वेवर डस्टर कार अपघात; सुमारे 700 किलो प्राण्याचे मांस जप्त

लोणावळा : पुणे ते मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा गावाच्या हद्दीत शनिवारी (28 जुन) डस्टर कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर पोलिसांनी कारमधून अंदाजे 700 किलो प्राण्याचे मांस जप्त केले असून, एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 4 लाख रुपये असल्याची माहिती आहे.

     लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. एक्सप्रेस वेवरील किलोमीटर क्र. 45 जवळील बोगद्याच्या समोरील यु-टर्नजवळ डस्टर (MH 48 S 7063) या सिल्व्हर रंगाच्या कारने सिमेंट डिव्हायडरला जोराची धडक दिली. अपघातानंतर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

     पोलीस नोंदीनुसार, कारच्या मागील भागात काळ्या प्लास्टिकमधून झाकलेले प्राण्याचे कातडी काढलेले मांसाचे भाग आढळले. अंदाजे 700 किलो मांसाची किंमत 2 लाख 80 हजार, तर डस्टर कारची अंदाजे किंमत 2 लाख 60 हजार असून एकूण मुद्देमाल 4 लाख इतका आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 256/2025 नोंदवण्यात आला आहे. यामध्ये भारतीय न्या. संहिता (BNS) 325, 281, 324(4), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(सी), 9(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सूर्यकांत वाणी यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

इतर बातम्या

आषाढी वारीचा उत्सव पद्मश्री डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालयात उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा हरिनामात उत्स्फूर्त सहभाग, वारकरी वेशभूषा अन् पालखीने भारावले वातावरण

लोणावळ्यात केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांची व्यापारी संघाने घेतली भेट; ब्लिंकिट ऑनलाईन सर्व्हिस मुळे लोणावळ्यातील लहान व्यवसायिकांवर मोठा परिणाम होत असल्याची मांडली खंत