Sinhgad Institute l सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये नव्या विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी वाटचालीला प्रेरणादायी सुरुवात
लोणावळा : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘StepUP’26 – Rise to the Challenge’ या दोन दिवसीय विद्यार्थी प्रेरणा व परिचय कार्यक्रमाचे आयोजन दि. १६ व १७ सप्टेंबर रोजी करण्यात आले. ‘Engineering – The Beginning of Journey’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचा उद्देश नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना संस्थेची संस्कृती, शैक्षणिक वातावरण आणि विविध संधींची ओळख करून देणे हा होता.
दि. १६ सप्टेंबर रोजी ‘दीक्षारंभ’ संकल्पनेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती वंदना, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व नृत्य सादरीकरणाने झाले. यावेळी एसटीईएसचे मुख्य प्रकल्प अधिकारी डॉ. एम. एस. गायकवाड, SIT चे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड, प्रथम वर्षाचे अध्यक्ष डॉ. पी. एस. पाटील, तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमात श्री. धैर्यशील देसाई, श्री. अमन कुमार आणि श्री. अभय कुरसाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्य, सकारात्मक विचारसरणी, उद्योगाभिमुख कौशल्ये, करिअर नियोजन, सततचे शिक्षण आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचे महत्त्व याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एम. एस. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, नवोपक्रम व मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री यांनी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन उपलब्ध संधींचा पुरेपूर उपयोग करावा, असे सांगितले.
दि. १७ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागांना भेट देऊन विभागप्रमुखांचे मार्गदर्शन घेतले. विविध विद्यार्थी क्लब, शैक्षणिक उपक्रम, तज्ज्ञांची व्याख्याने, माजी विद्यार्थ्यांशी संवाद, क्रीडा व गटपरिचयात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना, संवादकौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली. दोन दिवसीय ‘StepUP’26 – Rise to the Challenge’ हा कार्यक्रम नव्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणातील संधी व आव्हानांची ओळख करून देणारा आणि त्यांच्या ज्ञान, कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासाला प्रेरणा देणारा महत्त्वपूर्ण शुभारंभ ठरला.




















