Breaking news

भाजपा लोणावळा शहर व नाणे मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात; साखर, चहा पावडर छत्र्या व अन्न पॅकेट वाटप

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना भाजपा लोणावळा शहर व नाणे मंडळाच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. भाजपाच्या वतीने नागरिकांना 500 किलो साखर, सव्वाशे किलो चहा पावडर, शंभर छत्र्या व 1000 खिचडी भात पॅकेट चे वाटप करण्यात आले आहे. लोणावळा शहरातील हुडको कॉलनी, कैलास नगर, इंद्रायणी नगर, काँक्रीट इंडिया या भागातील नागरिकांना ही मदत देण्यात आली आहे. 

    लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव लोणावळा शहर व नाणे मंडळाचे अध्यक्ष अनिल गायकवाड महिला आघाडी अध्यक्ष परिजा भिलारे व भाजपच्या टीमच्या वतीने हुडको कॉलनी या ठिकाणी नागरिकांना मदतीचा हात म्हणून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पूर ओसरल्यानंतर भाजपच्या वतीने आज हुडका कॉलनी या ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांच्या सोबत त्यांच्या घरातील भिजलेले साहित्य व रस्त्यावर आलेला राडारोडा उचलण्यासाठी मदत करण्यात आली. 

इतर बातम्या