मोठी बातमी l पुणे लोणावळा उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या कामासाठी 5100 कोटीच्या निधीला अर्थसंकल्पीय मान्यता
लोणावळा : मागील अनेक वर्षापासून केवळ कागदावर असलेल्या पुणे लोणावळा उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या कामासाठी अखेर महाराष्ट्र शासनाने 5096.49 कोटी (5100 कोटी) रुपयांच्या निधीला अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या रेल्वे मार्गिका टाकण्याच्या कामाला गती प्राप्त होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने हे काम केले जाणार आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाचा 30% सहभाग असणार आहे. शासनाच्या हिश्याची 765 कोटी ही रक्कम राज्य शासनाकडून मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे वर्ग केले जाणार आहे.
मागील काही वर्षांपासून मुंबई पुणे दरम्यान मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक सुरू झाली असेल त्याचा परिणाम उपनगरीय वाहतुकीवर होत आहे. लोणावळा पुणे दरम्यान धावणाऱ्या अनेक लोकल गाड्या व त्यांचे वेळापत्रक यामध्ये मोठा बदल करण्यात आला होता. शासनाच्या या निर्णयामुळे व तिसरी व चौथी मार्गिका सुरू झाल्यानंतर लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुकर होणार आहे. कोरोना नंतर माला गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणखी दोन मार्ग काढ झाल्यानंतर लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या स्वतंत्रपणे धावू शकतील. अनेक गाड्यांना सिग्नल नसल्यामुळे अवतरला थांबावे लागते ती समस्या देखील यामुळे सुटणार आहे. मागील अनेक वर्षापासून लोणावळा पुणे दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गीकीचे काम व्हावे अशी मागणी प्रवासी संघटनांकडून व प्रवाशांकडून कडून वारंवार केली जात होती. मात्र निधी अभावी कामाला वेग मिळत नव्हता आता मात्र या प्रकल्पासाठी भूसंपादन व इतर तांत्रिक कामांना वेग येणार आहे.





















