Breaking news

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या चिपळूण-संगमेश्वर दौरा

चिपळूण / प्रतिनिधी (विलास गुरव) : राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार उद्या रविवार दिनांक 27 रोजी चिपळूण-संगमेश्वर दौऱ्यावर येत असून सकाळी 9.45 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित कोकण महाराष्ट्र-महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा सावर्डे येथे शुभारंभ होणार आहे. नंतर संगमेश्वरकडे रवाना होणार आहेत. हा दौरा यशस्वी करण्यासाठी आ. शेखर निकम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

      राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार रविवार दिनांक 27 रोजी चिपळूण-संगमेश्वर दौऱ्यावर येत आहेत. सावर्डे येथे सकाळी 9.45 वाजता कोकण महाराष्ट्र-महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ होईल. नंतर ते संगमेश्वर-कसबाकडे रवाना होणार आहेत. यावेळी सकाळी 10.30 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या जागेची पाहणी करण्याबरोबरच प्राचीन पुरातन मंदिराची देखील पाहणी करणार आहेत. यानंतर सकाळी 11.30 वाजता छत्रपती संभाजी महाराज स्मारकासंदर्भात संबंधित अधिकारी वर्गासोबत आढावा घेणार आहेत. नंतर संगम स्थळाची पाहणी करतील.

     पुन्हा ते सावर्डेकडे रवाना होतील. दुपारी 2 वाजता सह्याद्री स्कुल ऑफ आर्टला सदिच्छा भेट देतील. नंतर दुपारी 3 वाजता सह्याद्री पॉलिटेक्निकच्या सभागृहात कार्यकर्ता मेळावा होणार आहे. यावेळी आ. शेखर निकम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  हा मेळावा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

इतर बातम्या

Sangmeshwar l राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी प्रयत्नशील; छत्रपती संभाजी स्मारक भव्य दिव्य करण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागाने अभ्यास करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार