Breaking news

डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कँपस – अभियांत्रिकी व एम.सी.ए. प्रवेशासाठी अधिकृत स्क्रूटिनी केंद्र

तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी पदवी व एम.सी.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कँपस, तळेगाव मावळ यास अधिकृत कागदपत्रे छाननी (स्क्रूटिनी) केंद्र म्हणून मान्यता प्राप्त झाली असून संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू झाली आहे.

संस्थेची विशेषता म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग तसेच उत्कृष्ट प्लेसमेंटची हमी. महाविद्यालयात अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, वाय-फाय सुविधा, समृद्ध ग्रंथालय, सुसज्ज वसतिगृह, मैदानी क्रिडांगण आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांची सुविधाही उपलब्ध आहे.

चालू वर्षी अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध असून त्यात पुढील शाखांचा समावेश आहे:

  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स
  • कंप्यूटर सायन्स
  • कंप्यूटर इंजिनिअरिंग
  • इलेक्ट्रॉनिक्स अँड कंप्यूटर इंजिनिअरिंग
  • तसेच पदव्युत्तर स्तरावर एम.सी.ए. (व्यवस्थापन) अभ्यासक्रमासाठीही प्रवेश खुला आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह वेळेत स्क्रूटिनी केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. शिरबहादुरकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

76667 20378 / 76668 29653

इतर बातम्या